JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Ambegaon News : शरद पवारांची साथ का सोडली? दिलीप वळसे पाटलांनी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली खंत

Ambegaon News : शरद पवारांची साथ का सोडली? दिलीप वळसे पाटलांनी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली खंत

Ambegaon News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचा मतदारसंघ आंबेगाव येथे कार्यकर्ता मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

जाहिरात

शरद पवारांची साथ का सोडली?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायचंद शिंदे, प्रतिनिधी पुणे, 9 जुलै : मला ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सची नोटीस नाही. त्यामुळे मी शरद पवार यांची साथ सोडली नाही. माझं यामागे कोणतंही वैयक्तिक हित नाही, असं सांगत दिलीप वळसे पाटील यांनी आज शरद पवारांची साथ का सोडली? याचा खुलासा केला. वळसे पाटील मंत्री पदाची शपथ घेतल्यावर प्रथमच आज मतदार संघात आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. वळसे पाटील पुढे म्हणाले की, “मनाला खटकत होतं. एका बाजूला तालुक्याचा प्रश्न आणि दुसरीकडे पवार साहेबांचे प्रेम असा पेच निर्माण झाला. काही लोक म्हणतील की सत्तेच्या बाहेर राहूनही झालं असतं, मात्र अशा कामांसाठी सत्तेत राहणं गरजेचं असतं. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला” मनात एक शल्य होतं, राज्यात-देशात शरद पवार साहेबांसारखा एक मोठा नेता होता. असं असतानाही आम्हाला एकहाती जनतेनं सत्तेत का बसवलं नाही? वाचा - मोठी बातमी! अखेर नरहरी झिरवाळांचा अजित पवारांना पाठिंबा राज्यात नवीन समीकरण जुळून आलीत. अजित दादांच्या सोबतीने मीही त्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो. आपण हा निर्णय घेतला असला तरी आपण कोणीही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. आपली राष्ट्रवादी स्वतंत्र राहणार आहे. त्याद्वारेच आपण आपलं काम करणार आहोत. शरद पवार आपले नेते असून आपली लढाई शरद पवार साहेबांशी नाही असं सांगत वळसे पुढे म्हणाले की चालू आठवड्यात आंबेगाव तालुक्यात त्यांच्या होणाऱ्या सभेत सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हा. रोहित पवारांमुळं साहेबांची साथ सोडली? ज्यांचं वय 37 वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली. माझा अनुभव पाहता त्यांचं वयही लहान आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवं. माझी आणि रोहित पवारांची एकदा भेट झाली. तुमच्या मतदारसंघाचा प्रश्न असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि तुम्ही आंबेगाव विधानसभेतून उभे राहा. त्यामुळं या व्यतिरिक्त माझं कोणतंही भांडण नाही. मी साहेबांच्या कुटुंबाविरोधात कधीच जाऊ शकत नाही, असंही वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले. भाषणाचा शेवट करताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, उद्याच्या निवडणुकीत काय होईल, याची मी चिंता करत नाही. त्यामुळे मी घेतलेला निर्णय योग्यच आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या