JOIN US
मराठी बातम्या / पुणे / छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; फोन कॉल करून म्हणाला, उद्या तुम्हाला मारणार

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; फोन कॉल करून म्हणाला, उद्या तुम्हाला मारणार

छगन भुजबळ यांना मारण्याची सुपारी मिळाली असल्याचंही धमकी देणाऱ्याने सांगितलं. याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

जाहिरात

छगन भुजबळ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वैभव सोनावणे, पुणे, 11 जुलै : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांच्या कार्यालयात असलेल्या कार्यकर्त्यांच्या फोनवर कॉल करून ही धमकी दिली गेली. तसंच छगन भुजबळ यांना मारण्याची सुपारी मिळाली असल्याचंही धमकी देणाऱ्याने सांगितलं. याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून त्याने मद्यधुंद अवस्थेत फोन केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी छगन भुजबळ हे पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर कॉल आला. त्यावर छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली असल्याचं धमकी देणाऱ्याने सांगितलं. छगन भुजबळ यांच्या कार्यालयाने त्यानंतर तात्काळ याबाबतची माहिती पुणे पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने केला आणि मोबाईल नंबरच्या आधारे प्रशांत पाटील नावाच्या व्यक्तीला महाडमधून अटक केली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रशांत पाटीलने छगन भुजबळ यांना धमकी दिल्याचं स्पष्ट झालं. प्रशांत पाटील हा मूळचा कोल्हापुरचा असल्याची माहितीसुद्धा समोर आलीय. मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक; अजित पवार निघून गेल्यावर शिंदे-फडणवीस यांची चर्चा छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्याच्या फोनवर कॉल आल्यानंतर समोरून प्रशांत पाटील याने तुम्हाला मारायची मला सुपारी मिळाली असल्याचं सांगितलं. त्यानंतर सांगून काम करतो म्हणून तुम्हाला सांगितलं असंही तो म्हणाला. उद्या तुम्हाला मारणार असल्याचं सांगत प्रशांत पाटीलने धमकी दिली. दरम्यान, छगन भुजबळ यांना धमकी देण्यात आलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. तर खबरदारी म्हणून मंत्री भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या