कबड्डी खेळताना चक्कर आल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

पुण्याच्या शिरूर तालुक्यात पिंपळे जगताप गावात एका शाळेत कबड्डी खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. गौरव वेताळ असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.

Renuka Dhaybar
01 एप्रिल : पुण्याच्या शिरूर तालुक्यात पिंपळे जगताप गावात एका शाळेत कबड्डी खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. गौरव वेताळ असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो न्हावरा गावचा रहिवासी होता. जवाहर नवोदीत विद्यालयातील तो शिकत होता. शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता शाळेतील ग्राऊंड वरती कब्बडी खेळताना त्याला चक्कर आली आणि तो तसाच जागेवरती बेशुध्द पडला.शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला शिक्रापूर येथील हॉस्पीटल मध्ये नेलं, पण वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शाळेनं त्याला रुग्णालयात नेण्यास उशीर केला, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. आणि त्याचा मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिला आहे. त्याचा मृतदेह शिरूरला पाठवण्यात आला आहे. तिथे शवविच्छेदन केल्यावरच त्याच्या मृत्यूचं कारण समजू शकणार आहे.गौरवच्या मृत्युने परिसरात एकच हळहळ व्यक्त होतं आहे. गौरव हा एक उत्तम कब्बडी खेळणारा खेळाडू होता. त्यामुळे गौरवच्या मृत्युने क्रिडा क्षेत्रातून शोक व्यक्त होतं आहे.

Trending Now