भांडारकर तोडफोड प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या 68 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

भांडारकर संस्थेतील तोडफोड प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या सर्व 68 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय. तब्बल 13 वर्षे हा खटला सुरू होता, यादरम्यान 4 आंदोलक आरोपीचं निधनही झालंय. 2004साली जेम्स लेनच्या पुस्तकातील वादग्रस्त मजकुरावरून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्य विद्या संस्थेची तोडफोड केली होती.

Chandrakant Funde
पुणे, 27 ऑक्टोबर : भांडारकर संस्थेतील तोडफोड प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या सर्व 68 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय. तब्बल 13 वर्षे हा खटला सुरू होता, यादरम्यान 4 आंदोलक आरोपीचं निधनही झालंय. 2004साली जेम्स लेनच्या पुस्तकातील वादग्रस्त मजकुरावरून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्य विद्या संस्थेची तोडफोड केली होती.अमेरिकन लेखक जेम्स लेन याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर 'शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकामध्ये पान क्रमांक ९३ वर छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापला होता. या वादग्रस्त पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखकाने त्यास मदत करणार्‍या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील काही इतिहासकारांची नावे प्रसिध्द केली होती.

या वादग्रस्त पुस्तकातील पान नंबर ९३ वरील मजकूर हा त्यांच्या सांगण्यावरून लेखकाने लिहीलेला आहे, असे समजून संभाजी ब्रिगेडच्या १०० ते १२५ जणांनी वेगवेगळ्या वाहनांमधून उस्मानाबाद, कळंब, गेवराई, बीड, पंढरपूर आणि राज्यातील इतर ठिकाणावरून निघून इंदापूर येथील उजनी धरणाजवळील रेस्ट येथे जमून नंतर पुण्याकडे कूच केली आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची तोडफोड केली होती. त्यावेळी या तोडफोडीवरून त्यावेळी मोठं वादंग निर्माण झालं होतं.

Trending Now