अशोकराव मोहोळ अमृत महोत्सवी कार्यक्रमात बाळा नांदगावकरांनी अशी घेतली फिरकी

'सध्या निष्ठावान कुठेच दिसत नाही. आम्ही सध्या फेरीवाल्यासंदर्भात काम करत आहोत.राजकारणात पण फेरीवाले असतात, असं बाळा नांदगावकरांनी म्हणताच हशा पिकला.

Sonali Deshpande
पुणे, हलिमा कुरेशी, 26 नोव्हेंबर : माजी खासदार अशोकराव मोहोळ यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसेचे नेते  बाळा नांदगावकर  आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यात भाषणात चांगलीच जुगलबंदी रंगली होती.यावेळी शरद पवारही उपस्थित होते.'सध्या निष्ठावान कुठेच दिसत नाही. आम्ही  सध्या फेरीवाल्यासंदर्भात काम करत आहोत.राजकारणात पण फेरीवाले असतात, असं बाळा  नांदगावकरांनी  म्हणताच हशा पिकला. राष्ट्रवादीचं भाजपच्या सत्तेत चांगलं चाललंय. आमचं तसं अवघड, आत्ता फेरीवाले सापडले म्हणून बरं चाललंय,' असं म्हणत नांदगावकरांनी चांगलीच  फटकेबाजी केली . संजय काकडे कधी काळी फेरीवाले होते, हा संदर्भ नांदगावकरांनी घेतला.शरदराव आम्हाला बाळासाहेबांच्या जागी आहात.शरदरावांचं बोट धरून अनेकजण राजकारणात आले. अगदी गुजरातचे लोकपण आले आणि देशाचे पंतप्रधान झाले. बापट तुम्ही किमान करंगळी पकडा, दिल्लीला जाल.  संजय काकडे हुशार आहेत,' असं म्हणत नांदगावकरांनी  बापटांना टोला लगावला.

पवारसाहेब तुम्हाला एक पी (पद्मविभूषण ) मिळाला दुसरा पी (पंतप्रधानपद ) कधी मिळणार. मराठी माणसाच्या मनात खंत राहील असंही नांदगावकर म्हणाले.नांदगावकरांना गिरीश बापट यांनी 'बाळा आपण बाहेर बोलू, असं म्हणताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली .अशोकराव मोहोळ आणि त्यांच्या वडिलांनी मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यात केलेल्या कामांबद्दल पवारांनी गौरवोद्गार काढले.

Trending Now