रिक्षा चालक होणार पिंपरी चिंचवडचे नवे महापौर, पहा त्यांचा प्रेरणादायी प्रवास

पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी आज भाजपचे नगरसेवक राहुल जाधव यांची निवड होणार आहे.

पुणे, 04 ऑगस्ट : पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी आज भाजपचे नगरसेवक राहुल जाधव यांची निवड होणार आहे. मनसेतून भाजपध्ये दाखल झालेले राहुल जाधव नगरसेवक पदी निवडूण आल्यानंतर त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेवर पहिल्यांदाच सत्ता स्थापन करणारा भाजपचा हा दुसरा महापौर असणार आहे. नियोजित महापौर राहुल जाधव यांचा नगरसेवक ते थेट महापौर असा राजकीय कारकीर्दचा चढता आलेख जरी दिसत असला तरी हा प्रवास त्यांच्यासाठी खूप खडतर होता. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या जाधव यांनी आपल्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 5 वर्षे रिक्षा चालवलेली आहे. आणि आज चे त्यांच्या शहराचे प्रथम नागरिक बनले आहेत.मावळते महापौर नितीन काळजे आणि नियोजित महापौर राहुल जाधव यांच्यात अनेक साम्य आहेत. हे दोघेही भोसरीच्या आमदारांचे कट्टर समर्थक आहेत. दोघेही शेतकरी कुटुंबातील आहेत. दोघांनाही बैलगाडा शर्यतीची आवड आहे. दोघांचे शिक्षणही जवळपास सारखेच (काळजेंचे अकरावी, तर जाधवांचे दहावी झालेली आहे. दोघांचाही प्रभाग भोसरी मतदारसंघात आहे. भोसरीच्या आमदारांना 2014च्या मोदी लाटेत अपक्ष म्हणून निवडून आणण्यात दोघांचाही मोठा वाटा आहे. दोघेही पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील आहेत.

हेही वाचा...औरंगजेबच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नोकरी सोडून सैन्यात भर्ती होणार त्याचे ५० मित्रप्लास्टिक बंदीमुळे दिवाळखोर झालेल्या व्यापाऱ्याची आत्महत्याआज 'या' राशींना आहे जास्त धनप्राप्ती

Trending Now