औषधासाठी आग्रह केला म्हणून मनोरुग्ण मुलाने फोडला आईचाच डोळा

औषधासाठी आग्रह करणाऱ्या आईचे डोळ्या फोडल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे.

Renuka Dhaybar
30 एप्रिल : औषधासाठी आग्रह करणाऱ्या आईचे डोळ्या फोडल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. या घटनेनंतर जखमी झालेल्या 75 वर्षीय आईवर पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाल्हेकरवाडी परिसरात राहणाऱ्या सुमन सावंत यांना 35 वर्षीय मुलगा मनोरुग्ण असल्याचं कळतंय.या घटनेत जखमी झालेल्या 75 वर्षीय सुमन सावंत यांच्या डोळ्याला खोलवर ईजा झाली आहे. सावंत यांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, ही घटना शनिवारी घडली आहे. सुमन सावंत यांना 35 वर्षीय मुलगा आहे आणि तो मनोरूग्ण असल्याने नेहमीच आई वडलांना मारत असतो. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.हा प्रकार घडल्यानंतर सुमन यांच्या डोळ्यातून खूप रक्तस्त्राव झाला. शेजाऱ्यांनी हे पाहिल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांच्यावर हल्ला करणारा त्यांचा मुलगा भूपेंद्र मात्र फरार आहे.

पण कितीही झालं तरी मातृप्रेम हे वेगळंच असतं. कारण ऐवढं असतानाही आपल्या मुलाला अटक होईल म्हणून या माऊलीने पोलिसात तक्रार केली नाही. 

Trending Now