Your browser doesn't support HTML5 video.
16 मार्च
मुंबई : दोन वर्षांपूर्वी राज्य बालहक्क आयोगाची महाराष्ट्रात स्थापना झाली. पण अजूनही बालहक्क आयोग अस्तित्वात आलेला नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. या आयोगाचे अध्यक्ष तर सोडाच पण सदस्यांचीही नेमणूक अजून झालेली नाही. याविषयी सरकारला जाब विचारावा लागेल आणि आयबीएन लोकमतच्या माध्यमातून तो विचारला जाईल अशी ग्वाही आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी यावेळी दिली. आज मुंबईत महाराष्ट्र बालहक्क अभियान आणि सीआरवाय(CRY) या संस्थेच्या वतीनं बाल हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निखिल वागळे यांचा बालसाथी पुरस्कारानं गौरव करण्यात आला. हा पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथ आवाड यांच्या हस्ते देण्यात आला. शिक्षण हक्क कायदा जरी चांगला असला तरी त्यातल्या अनेक बाबी कागदावरच आहेत असं मत बाल हक्क अभियानचे समन्वयक बी. पी. सुर्यवंशी यांनी व्यक्त केलं. शिवाय स्थापन झालेल्या समित्या प्रत्यक्षात आल्या नसून त्या अजून कायदावरच असल्याची टीका त्यांनी केली.