भारतातील जवळपास प्रत्येक गावात मंदिर आहे. प्रत्येक मंदिराला वेगळा इतिहास आहे. साधारणपणे सर्व मंदिरांमध्ये पेढा, लाडू इत्यादी गोष्टी प्रसाद म्हणून दिल्या जातात. पण, काही मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून मांस दिले जाते, हे एकूण अनेकांना धक्का बसेल. (सर्व प्रतिकात्मक प्रतिमा)
मुनियादी मंदिर, तामिळनाडू हे मंदिर तामिळनाडूमधील मदुराईमधील वदक्कमपट्टी नावाच्या एका छोट्या गावात आहे. येथे दरवर्षी तीन दिवस उत्सव भरतात. हे मुनीश्वराचे मंदिर आहे. त्यांना भगवान शिवाचा अवतार म्हणून ओळखले जाते. येथे चिकन आणि मटण बिर्याणी प्रसाद म्हणून दिली जाते. (प्रतिकात्मक चित्र)
विमला मंदिर, ओडिशा : हे मंदिर पुरी, ओडिशा येथील जगन्नाथ मंदिर संकुलात आहे. हे शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान, मार्कंडा मंदिराच्या कुंडातून मासे पकडले जातात आणि तेथेच शिजवले जातात. त्यानंतर देवी विमला यांना नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. काही जण बकऱ्यांचा बळीही देतात. जगन्नाथ मंदिराचे मुख्य दरवाजे उघडण्यापूर्वी हे सर्व केलं जातं. (प्रतिकात्मक चित्र)
तारकुल्हा देवी मंदिर, उत्तर प्रदेश: गोरखपूरच्या या मंदिरात दरवर्षी खिचरी मेळा भरतो. चैत्र नवरात्रीत या मंदिराला भेट देण्यासाठी देशभरातून लोक येतात. मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवतेला बकरा अर्पण केला जातो. मांस शिजवून अर्पण केले जाते. (प्रतिकात्मक प्रतिमा)
पारासनिक कोडवू मंदिर, केरळ: हे मंदिर मुत्थप्पनला समर्पित आहे. मुथप्पन मंदिर हे भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे अवतार मानले जातात. या मंदिरात मुत्थप्पनला मासे अर्पण केले जातात. असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात, असा तेथे भेट देणाऱ्या भाविकांचा विश्वास आहे. मंदिरात येणाऱ्यांना मासे प्रसाद म्हणून दिले जातात. (प्रतिकात्मक चित्र)
कैलघाट, पश्चिम बंगाल: देशातील 51 शक्तीपीठांपैकी हे एक आहे. येथील मंदिर 200 वर्षे जुने आहे. येथील अनेक भाविक काली देवीला प्रसन्न करण्यासाठी बकऱ्यांचा बळी देतात. (प्रतिकात्मक प्रतिमा)
दक्षिणेश्वर काली मंदिर, पश्चिम बंगाल: हे आपल्या देशातील आणखी एक अतिशय लोकप्रिय शक्तीपीठ आहे. या मंदिरात पूजेनंतर देवी कालीला नैवेद्य म्हणून मासे अर्पण केले जातात. मात्र, इथे पशू बळी देण्यावर बंदी आहे. (प्रतिकात्मक प्रतिमा)
कामाख्या मंदिर, आसाम: हे भारतातील प्रसिद्ध शक्तीपीठांपैकी एक आहे. तांत्रिक शक्तींवर विश्वास असणारे अनेक लोक कामाख्या देवीची पूजा करतात. हे आसामच्या नीलाचल हिल्समध्ये आहे. इथे शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे प्रसाद अर्पण केले जातात. पण, कांदे आणि लसूण कशातच वापरले जात नाहीत. बकरीचे मांस आणि मासे यांचा प्रसाद देवीला अर्पण केला जातो. त्यावेळी मंदिराचे दरवाजे बंद असतात.(प्रतिकात्मक चित्र)
तारापीठ, पश्चिम बंगाल: बीरभूममधील तारापीठ मंदिर देवी दुर्गेला समर्पित आहे. या मंदिरात भाविक मांस अर्पण करतात. त्या पदार्थांना दारूसह देवतेला नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर ते भाविकांना वाटण्यात येते.(प्रतिकात्मक चित्र)