मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » बाळाची चिडचिड-रडण्यामुळे वाढते चिंता; तुमच्याकडून मुख्य कारणांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना?
News18 Lokmat | April 02, 2023, 16:33 IST | Mumbai, India

बाळाची चिडचिड-रडण्यामुळे वाढते चिंता; तुमच्याकडून मुख्य कारणांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना?

बाळाची झोप पूर्ण होत नसल्यामुळे त्याच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. बाळाचा मूड (Mood) दिवसभर खराब राहतो. त्यामुळेच आई आणि घरातले सगळेजण चिंतेत पडतात. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवा.

लहान बाळाची झोप पूर्ण होणं अतिशय महत्वाचं आहे. बाळाची झोप पूर्ण न झाल्यास दिवसभर बाळ चिडचिड करत राहतं आणि तब्येतही सुधारत नाही.
1/ 11

लहान बाळाची झोप पूर्ण होणं अतिशय महत्वाचं आहे. बाळाची झोप पूर्ण न झाल्यास दिवसभर बाळ चिडचिड करत राहतं आणि तब्येतही सुधारत नाही.

2/ 11

बाळाला शांत झोप लागावी यासाठी पाळण्यामधील अंथरूण व्यवस्थित असायला हवं. बाळाला पाळण्यामध्ये झोपवण्याआधी पाळणा स्वच्छ करावा. त्यातील चादर किंवा गादी व्यवस्थित करून ठेवावी.

3/ 11

बाळाला झोपवण्याआधी त्याचं डायपर चेक करा. बाळाने शू किंवा शी केली असेल तर, ओलाव्यामुळे बाळाला चांगली झोप लागणार नाही. त्यामुळे झोपण्याआधी बाळाचं डायपर शक्यतो बदलावं.

4/ 11

बाळांना झोपवण्याआधी शक्यतो कोमट पाण्याने अंघोळ घालावी. त्यामुळे बाळ रिलॅक्स होईल आणि त्याला शांत झोप लागेल. अंगाला शेक बसल्याने बाळाला आराम वाटेल. हा सर्वसाधारणपणे केला जाणारा जुना उपाय आहे.

5/ 11

भूक लागलेली असताना लहान मुलाला चांगली झोप येऊ शकत नाही. उलट सतत झोपमोड होऊन बाळ रडायला लागेल. त्यामुळे बाळाला झोपवताना त्याचं पोट पुरेसं भरलेलं असेल याची काळजी घ्यावी.

6/ 11

बाळांना बोलता येत नसलं तरी आपली जवळची व्यक्ती आसपास असल्याने त्यांना फार सुरक्षित वाटतं. त्यामुळे बाळाला झोपवताना आपल्या मांडीवर, खांद्यावर झोपवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे त्यांना सुरक्षित वाटेल नंतर अलगद अंथरुणावर ठेवावे.

7/ 11

बाळाला हलक्या हाताने चांगल्या तेलाने मॉलिश करावी आणि त्यानंतर थोड्या वेळाने कोमट पाण्याने त्याला आंघोळ घालावी. शक्य असेल तर बाळाच्या डोक्यावर तेल लावल्याने देखील त्याला शांत झोप लागू शकेल. अर्थात बाळाला मॉलिश करण्याविषयी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

8/ 11

बाळ झोपेत असताना घरात वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. घरामध्ये आवाज असेल गोंगाट असेल तर, बाळ लवकर झोपणार नाही. त्यामुळे बाळाला झोपवताना घरामधील टीव्ही किंवा इतर आवाज बंद करावेत.

9/ 11

छोट्या बाळांना दुपट्यामध्ये बांधून झोपण्याचा प्रयत्न करावा. झोपेत पाय हल्ल्यामुळे मुलांची झोपमोड होते आणि ते रडत बसतात.

10/ 11

बाळ थोडं मोठं असेल आणि त्याला बरं जेवण सुरू केलेलं असेल. तर जे जेवण त्याला भरवलं जातं ते त्याला पचतं का? याची खात्री करून घ्यावी. जेवण जड असल्यास बाळाला ते पचणार नाही

11/ 11

पोटात त्रास होत असल्यामुळे बाळाची सतत झोपमोड होऊ शकते. अंगावर दूध पित असेल तर, आईनेही पौष्टीक आणि हलका आहार घ्यावा.

Published by:Ramesh Patil
First published:April 02, 2023, 16:33 IST

ताज्या बातम्या

सुपरहिट बॉक्स