मराठी बातम्या » फोटोगॅलरी » लाइफस्टाइल » भारतातल्या 'या' जमातीत गोरं मुल जन्माला येणं पाप! देतात मृत्यूची शिक्षा
News18 Lokmat | March 22, 2023, 07:15 IST | Mumbai, India

भारतातल्या 'या' जमातीत गोरं मुल जन्माला येणं पाप! देतात मृत्यूची शिक्षा

भारतातल्या अंदमान-निकोबार बेटांवर जारवा (Jarwa) ही आदिवासी जमात आजही वास्तव्य करून आहे. या जमातीच्या नागरिकांमध्ये गोऱ्या बाळाचा जन्म झाल्यास त्याला मारून टाकलं जातं.

जगात अनेक जाती-धर्मांचे लोक राहतात. भारतातही अनेक जाती-जमाती अस्तित्वात आहेत; मात्र अशी एक जमात आहे, जी अजूनही पाषाणयुगाप्रमाणे जगते, असं म्हणायला हरकत नाही. भारतातल्या अंदमान-निकोबार बेटांवर (Andaman-Nicobar Islands) जारवा (Jarwa) ही आदिवासी जमात आजही वास्तव्य करून आहे. या जमातीच्या नागरिकांमध्ये गोऱ्या बाळाचा जन्म झाल्यास त्याला मारून टाकलं जातं.
1/ 7

जगात अनेक जाती-धर्मांचे लोक राहतात. भारतातही अनेक जाती-जमाती अस्तित्वात आहेत; मात्र अशी एक जमात आहे, जी अजूनही पाषाणयुगाप्रमाणे जगते, असं म्हणायला हरकत नाही. भारतातल्या अंदमान-निकोबार बेटांवर (Andaman-Nicobar Islands) जारवा (Jarwa) ही आदिवासी जमात आजही वास्तव्य करून आहे. या जमातीच्या नागरिकांमध्ये गोऱ्या बाळाचा जन्म झाल्यास त्याला मारून टाकलं जातं.

2/ 7

जगातल्या बहुतांश जमातींच्या व्यक्तींनी स्वतःला आधुनिक युगाशी जुळवून घेतलं आहे; मात्र काही जमाती अशाही आहेत, की त्या अजूनही पाषाणयुगाप्रमाणेच जगतात. त्यापैकी एक ही जारवा जमात आहे. ही आतापर्यंतची सर्वांत प्राचीन जमात आहे.

3/ 7

गेल्या पंचावन्न हजार वर्षांपासून या जमातीतली माणसं या बेटांवर राहत आहेत. त्यांचं मूळ आफ्रिकेतलं (African Origin) आहे असं मानलं जातं; पण गेल्या अनेक वर्षांपासून ते भारतीय उपखंडाचा भाग झाले आहेत. ही जमात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

4/ 7

कारण सध्या जारवा जमातीच्या केवळ 380 व्यक्तीच उरल्या आहेत. या जमातीची माणसं आजही शिकार करून उपजिविका करतात. धनुष्यबाणाचा वापर करून मासे किंवा खेकड्यांची शिकार करतात. समूहाने डुकरांची शिकार करतात.

5/ 7

जारवा जमातीत आणखीही काही विचित्र प्रथा पाळल्या जातात. त्यातली एक म्हणजे एखाद्या स्त्रीनं सुंदर, गोऱ्या बाळाला जन्म दिला, तर त्या बाळाला लगेचच मारून टाकलं जातं. त्याचं कारण जारवा जमातीतली माणसं काळी असतात. आफ्रिकेत मूळ असल्यानं त्यांचा रंग काळाच असतो. मग गोऱ्या रंगाचं बाळ म्हणजे इतर जमातीतलं किंवा समुदायाचं असू शकतं, असा समज करून त्याला मारलं जातं. या जमातीत बाळाचा जन्म झाल्यावर जमातीतल्या सर्व महिला त्याला स्तनपान देतात. यामुळे समुदाय एकत्र राहण्यास मदत होते, असं त्यांचं म्हणणं आहे.

6/ 7

या जमातीत काळ्या रंगाचंच मूल जन्माला येणं गरजेचं असतं. त्यासाठी ते गर्भवती महिलेला प्राण्याचं रक्तही प्यायला देतात. प्राण्याचं रक्त प्यायल्यानं जन्मणाऱ्या बाळाचा रंग काळाच होतो, असा त्यांचा समज आहे. कहर म्हणजे गोऱ्या बाळाचा जन्म झाला, तर त्याचे वडीलच त्याला मारून टाकतात.

7/ 7

इतकंच नाही, तर एखादी स्त्री विधवा झाली, तरी तिच्या मुलांना मारून टाकलं जातं. या जमातीची माणसं अजूनही इतर माणसांमध्ये मिसळत नाहीत. या विचित्र प्रथांमुळेच कदाचित जारवा जमात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पर्यटकांनाही जारवा जमातीच्या माणसांना भेटण्यास मनाई असते. त्यांचे फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ अपलोड करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

Published by:Rahul Punde
First published:March 22, 2023, 07:15 IST

ताज्या बातम्या

सुपरहिट बॉक्स