World beard day : ९ बॉलिवूड स्टार्सचा हटके बियर्ड लुक पाहिलात का?

क्लीन शेव्ड लुक हा पूर्वीपासून भारदस्त, प्रोफेशनल, डीसेंट आणि इम्प्रेसीव्ह समजला जायचा. पण असेही काही पुरुष आहेत ज्यांना दाढी वाढवायला खूप आवडते आणि त्यांना तो लूक सुटही होतो. सध्या कलाकारांमध्ये विविध प्रकारची दाढी ठेवण्याचा ट्रेंड खूप चालतोय. आज ‘वर्ल्ड्स बियर्ड डे’ आहे. चला तर मग जाणून घेऊ या बॉलिवूडच्या अशा कलाकारांबद्दल जे त्यांच्या बियर्ड लुकसाठी फेमस आहेत. अक्षय कुमार – खिलाडी कुमार म्हणून प्रसिद्ध असलेला अक्षय दाढीतही झकास दिसतो. विराट कोहली – अभिनेत्यांना पडद्यावर अनेक पात्रं साकारायची असतात. त्यामुळे ते वेळवेगळ्या लुक्समध्ये दिसतात. पण क्रिकेटपटूंबद्दल बोलायचं झालं तर विराटचं नाव घ्यायलाच हवं. त्याची फलंदाजी तर जगप्रसिद्ध आहेच त्यासोबत तो त्याच्या बियर्ड लुकसाठीही नेहमी चर्चेत असतो.

अर्जुन कपूर – बॉलिवूडमध्ये अर्जुन कपूर आणि रणवीर सिंगची जोडी ही खूप गाजली. रणवीरप्रमाणेच अर्जुनचा बियर्ड लुक देखील प्रेक्षकांना आवडला. हृतिक रोशन - हृतिकने बँग बँग या चित्रपटापासून दाढी ठेवण्यास सुरुवात केली. बॉक्सऑफिसवर जरी हा चित्रपटा आपटला असला तरी यामधील त्याचा बियर्ड लुक मात्र हिट ठरला. रितेश देशमुख – मराठमोळ्या रितेश देशमुखचा बियर्ड लूक देखील त्याच्या फॅन्सना आवडला आहे. रणवीर सिंग – सुरुवातीच्या बऱ्याच चित्रपटात रणवीरने दाढी ठेवली नव्हती. बिनादाढीचा लुक त्याच्या फॅन्सना आवडला होता. पण रामलीला या चित्रपटात तो पहिल्यांदा बियर्ड लुकमध्ये दिसला आणि त्यानंतर बाजीराव मस्तानी, पद्मावत यासारख्या चित्रपटात त्याचा बियर्ड लुक खूप हिट झाला. शाहरुख खान – बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने त्याच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक पात्रं साकारली आहेत. पण त्याचे असे कमीच चित्रपट आहेत ज्यामध्ये त्याने दाढी ठेवली आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्या या दुर्मीळ बियर्ड लूकलाही भरपूर पसंती दिली आहे. शाहिद कपूर – बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहिदला त्याच्या बियर्ड लूकमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. सुनील शेट्टी – सुनील शेट्टी हा ९०च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेता मानला जातो. सध्या तो चित्रपटापासून लांब असला तरी त्याच्या बॉडीबिल्डिंग आणि त्याच्या बियर्ड लुकमुळे चर्चेत आहे.

Trending Now