PHOTOS : भारतासाठी व्हॉट्सअॅपने घेतला मोठा निर्णय,'हे' फिचर बदलले

आता व्हॉट्सअॅपवर ५ पेक्षा जास्त मॅसेजेस फॉरवर्ड करता येणार नाहीत. वकंपनीने हे पाऊल सध्या वाढत असलेल्या खोट्या आणि अफवांच्या मॅसेजेस मुळे उचलले आहे. मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप ने जाहीर केलं की, भारतात युझर्स ५ पेक्षा जास्त एखाद्या पोस्टला फॉरवर्ड करू शकत नाही. तसंच व्हॉट्सअॅप वरून क्विक फॉरवर्डची सुविधा ही काढून टाकणार आहे. सध्या सर्वत्र वाऱ्या सारख्या पसणाऱ्या अफवा आणि खोटे मेसेजेसला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. खोट्या मॅसेजेसने भारतात मॉब लिंचिंगच्या घटना वाढण्याचं काम केलं आहे. व्हॉट्सअॅपचे भारतातील वापरकर्ते इतर कुठल्याही देशातल्या वापरकर्त्याच्या तुलनेत जास्त संदेश-मेसेज, फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करतात.

भारतात २० कोटी पेक्षा जास्त व्हॉट्सअॅपचे युझर आहेत फेसबुकमुळे मालक असलेल्या व्हॉट्सअॅपचे जगभरात १०० कोटींपेक्षा जास्त यूझर आहेत. ज्यात भारतातील युझर्सची संख्या २० कोटींहून अधिक आहे. व्हॉट्सअॅपवर नेहमी पसरणारे खोटे संदेश, अफवा आणि खोट्या सूचना यामुळे भारत सरकारलाही सतत टीकेला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच सध्या प्रायोगिक तत्वावर काही दिवसांसाठी मेसेज फॉरवर्डची मर्यादा ५ केली जाणार आहे आणि सोबतच क्विक फॉरवर्ड ची सुविधाही काढली जाणार आहे. गेल्या काही घटनांमध्ये जमावाला भडकावण्याचं काम केलं आहे. ज्यामुळे देशाच्या बर्याच भागात मॉब लिंचिंग सारख्या घटना ही घडल्या आहेत.

Trending Now