संघाच्या खराब प्रदर्शनानंतरही विराटने मोडला सचिनचा 'विक्रम'

इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय खेळाडू काही खास कामगिरी दाखवू शकले नाहीत. दुसऱ्या दिवसा अखेर भारताने १७४ धावा करुन ६ विकेट्स गमावल्या होत्या. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक मात्र एका धावाने हुकलं. 49 वर असताना बेन स्ट्रोक्सने त्याची विकेट घेतली. विराट त्याच्या कारकिर्दीतील 383वी कसोटी खेळतोय. काल 49 धावांसह त्याने 18 हजार धावा पूर्ण केल्यात. 

त्याचबरोबर सर्वात कमी कसोटीत धाव्वांचा हा डोंगर रचणारा विराट हा पहिलाच खेळाडू आहे. विराटने हा विक्रम करत सचिन तेंडूंलकर आणि ब्रायन लारालाही मागे टाकलंय. सचिनने 412व्या कसोटीत 18 हजार धावा केल्या तर लाराने 411व्या कसोटीत हा विक्रम केला होता.

Trending Now