नेपाळचे चंद्र बहादुर दांगी होते जगातले सर्वात बुटके व्यक्ती

Sonali Deshpande
नेपाळमधील 'चंद्र बहादुर दांगी' होते जगातले सर्वात ठेंगणे व्यक्ती यांची उंची फक्त 54.6 सेंटीमीटर म्हणजे 21.5 इंच एवढीच होती 2012ला यांच्या नावाची नोंद गिनीज बुकमध्ये जगातील सर्वात ठेंगणे व्यक्ती म्हणून करण्यात आली

चंद्र बहादुर यांची उंची मोजण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी काठमांडूला आले होते 24 तासात तीन वेळा उंची मोजली, ती 21.5 इंच असल्याचे जाहीर केलं चंद्र बहादुर याचे निधन 2015 मध्ये वयाच्या 75व्या वर्षी निमोनिया आजाराने अमेरिकेत झाले दांगी यांना 5 भाऊ आणि 2 बहिणी होत्या ते आपल्या भावासोबत नेपाळी पारंपरिक कपडे शिवण्याचे काम करायचे त्यांचं गाव काठमांडूपासून जवळ जवळ 250 किमी अंतरावर आहे आपलं लग्न नाही होऊ शकले याची खंत त्यांना नेहमी होती

Trending Now