PHOTOS : तिच्या अंगात राक्षस होता,आईने 4 महिन्याच्या मुलीचा कापला ब्लेडने गळा !

उत्तरप्रदेश,22 आॅगस्ट : अंधश्रद्धेतून एका आईने आपल्या पोटच्या गोळ्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडलीये. आपल्या मुलीला भूतबाधा झाली म्हणून या आईने चार महिन्याच्या चिमुकलीचा गळा चिरून हत्या केली. एवढंच नाहीतर मुलीचं शीर आणि धड एका बॅगेत लपवून ठेवलं होतं. उत्तर प्रदेशमधील झांसी जिल्ह्यात ही ह्रद्रयद्रावक घटना घडलीये. दोन दिवसांपूर्वी सोमवारी ही घटना समोर आली. या निर्दयी आईने आपल्या मुलीवर भूताची बांधा झाली असा संशय होता. त्यामुळे या आई या चार महिन्याचा चिमुरडीचा ब्लेडने गळा कापला. आपण केलेले हे क्रुर कृत्य जगासमोर येऊ नये म्हणून तिने मुलीचे शीर आणि धड एका कापडी बॅगेत लपवून ठेवले.

कुटुंबातील सदस्यांना हा भंयकर प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी या घटनास्थळी धाव घेतली आणि या निर्दयी आईला ताब्यात घेतलं. जेव्हा बॅगेतून मुलीचे शीर आणि धड बाहेर काढले तेव्हा सर्वांना एकच हादरा बसला. या महिलेची चौकशी केली असता आपल्या क्रुर कृत्याचा तिने कबुलीजबाब दिला. आपल्या मुलीला भूताची बांधा झाली होती. तिला मुक्ती मिळावी म्हणून मी तिचा गळा चिरला अशी कबुलीही या निर्दयी मातेनं दिली. ही घटना गावभर पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली.

Trending Now