PHOTOS : पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ट्विंकलनं रणवीरचा घेतला किस, सगळे बघत राहिले!

नुकतंच ट्विंकल खन्नाच्या तिसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या वेळी सोनम कपूर, रणवीर सिंग, करण जोहर असे बाॅलिवूडचे अनेक दिग्गज हजर होते. यावेळी ट्विकलचा पती अक्षय कुमारनं रणवीरला पुस्तकातले काही उतारे वाचून दाखवले.

ट्विंकलनं यावेळी आनंदानं रणवीरला आलिंगन दिलं आणि त्याच्या गालावर हलके किस केला. ट्विंकलची अगोदर 'मिसेस फनीबून्स' आणि 'द लीजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद' ही पुस्तकं प्रकाशित झालीयत. 2015ला ट्विंकलचं नवं पुस्तक आलं होतं. त्याच नावानं ती ओळखायला लागली होती. अक्षयनं गोल्ड सिनेमाच्या प्रमोशन वेळीच या तिसऱ्या पुस्तकाबद्दल सांगितलं होतं. बाॅलिवूडच्या अनेक हस्तींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Trending Now