व्हॉट्सअॅपवर 'गे' म्हणून चिडवलं, मित्राने घेतला असा बदला

सोशल मीडियावर दोन तरुण एकमेकांना गे म्हणून चिडवत होते. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने दुसऱ्या तरुणाची हत्या केल्याची घटना लंडनमध्ये घडलीये. आरोपी तरुणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. लंडन इथं साऊथ ईस्ट इथं केंटमधील पॉल आणि जॉर्डन सोबत शिक्षण घेत होते. दोघे एकमेकांना फार असे ओळखत नव्हते पण तरीही दोघे एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये होते. आइस सिटी बॉईज नावाच्या ग्रुपमध्ये हे दोघे जण होते. एप्रिल 2017 मध्ये या ग्रुपवर गे विषयावर वाद उफाळला. त्यावरून दोघांनी एकमेकांना गे म्हणून चिडवलं. ग्रुपवरच्या वाद सुरू असताना इतरांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण वाद वाढत गेला. पॉलने जॉर्ड़नला सनकी म्हटलं तर जॉर्डन ने पॉलला आईवरील अश्लील शेरेबाजी केली. ही गोष्ट पॉलला खटकली. त्यानंतर पॉलला थेट मारहाण करण्यासाठी आमंत्रणच दिलं.

त्यानंतर दोघांमध्ये एका ठिकाणी जोरदार मारामारी होणार होती. पॉलने आपल्यासोबत एक चाकूही ठेवला. त्याठिकाणी व्हाॅट्सअॅप ग्रुपमधील इतर सदस्यही जमा झाले. पॉल आणि जॉर्डनमध्ये जोरदार मारामारी सुरू झाली आणि काही क्षणातच पॉलने चाकू काढून जॉर्डनवर हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की जॉर्डन जागेवरच कोसळला. तिथे उपस्थिती असलेले त्याचे मित्रही पळून गेले. या भांडणात चाकूचा एक भाग घटनास्थळीच पडला. पॉलने त्याच परिस्थितीत घटनास्थळावरून धाव घेतली. त्यानंतर पॉलने मोबाईल फोन नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण यात त्याला यश आले नाही. पोलिसांच्या कुत्र्यानी माग काढून पॉलला ताब्यात घेतलं. अखेर याच वर्षी पॉलला खून प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Trending Now