PHOTOS : असे तयार झाले सोनेरी पेढे!

News18 Lokmat
पुणे तिथे काय उणे असं उगाच म्हटलं जात नाही. आता तर पुण्यातील एका शेतकऱ्याने 1 कोटी 12 लाखांची जॅग्वार कार खरेदी केली. त्याच्या आनंदात त्यांनी सोन्याचा वर्ख असलेले पेढे वाटले. पण सोनेरी पेढ्याची कल्पना भन्नाट अशीच आहे. पुण्याच्या धायरी भागातल्या सुरेश पोकळे यांना सोन्याची आणि गाड्या घेण्याची खूप हौस. त्यांनी नुकतीच 1 कोटी 12 लाखाची जॅग्वार कार विकत घेतली. आता 1 कोटीची कार घेतली म्हटल्यावर शानही वाढली. म्हणूनच 1 कोटीची कार घेण्याचा जल्लोष ही तसाच साजरा केला. पोकळे कुटुंबाने सोन्याचा वर्ख असलेली मिठाई वाटून साजरा केला. पोकळे यांनी काका हलवाईकडून 7000 रुपये किलोच्या दराने सोन्याचा वर्ख असलेली 3 किलो मिठाई तयार करून घेतली. आणि ही सोनेरी मिठाई त्यांनी आप्तस्वकीय आणि मित्रमंडळींना वाटली.

याबद्दल सुरेश पोकळे यांना विचारले असता ते म्हणाले की, मी नवी गाडी घेतली. मी टिव्हीवर एक मालिका पाहिली होती. त्यात बहिणीने भावाला सोन्याचा पेढा भरवला होता. त्यामुळे मलाही तसाच पेढे तयार करण्याची कल्पना सुचली आणि काका हलवाईचे मालक अविनाश गाडवे यांना फोन केला. मग तसे पेढे तयार केले. त्या सोन्याच्या पेढ्यावर सोन्याचा वर्ख आहे. मला पहिल्यापासून सोन्याची आवड होती असं पोकळे यांनी सांगितलं. काका हलवाईचे मालक अविनाश गाडवे म्हणतात की, सुरेश पोकळे यांच्या कल्पनेनुसार सोन्याचा पेढे तयार करण्याचं ठरवलं. त्याआधी मी त्यांना मलाई पेढा, केशरी पेढा, ड्रायफ्रुड पेढा दाखवला. पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर सोन्याचा वर्ख लावून पेढा तयार केला. या पेढ्यामध्ये केसराचं प्रमाण जास्त आहे. ड्रायफ्रुड, मलाई पेढ्याचं कोटिंग वापरून सोन्याचा वर्ख लावला. गाडी घेतली म्हणून पेढा वाटण्याची पद्धत जुनी आहे, पण सोन्याचा वर्ख असलेली मिठाई हा पुण्यात चर्चेचा विषय बनलाय.

Trending Now