कालचा धडा घेत राहणेने आज सुधारली आपली चूक

मुंबई, 3 ऑगस्ट : एजबेस्‍टनमध्ये सुरू असलेल्या भारत-इंग्लंडचा कसोटी मालिकेचा आज तीसरा दिवस होता. आजच्या खेळादरम्यान अजिंक्य रहाणेने डेव्हिड मलानच्या चेंडूचा झेल घेतला आणि सामन्याचे रुपच बदलून टाकले. या मालिकेच्या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणेकडून स्लिपमधला झेल सुटला होता. पण आज तिसऱ्या दिवशी परत तीच चुक न करता, त्याने २६ व्या ओव्हरमध्ये मलानने मारलेल्य चेंडूचा झेल घेतला आणि त्याला २० धावांवर परत पाठवले. भारतीय संघ हा स्लिपमध्ये कॅच झेलण्यात शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारी २०१५ ते आत्तापर्यंत पाहिलं तर भारतीय संघाने ६७ टक्के स्लिपमध्ये कॅच घेतल्या.

काल रहाणे आणि भारताचा क्षेत्ररक्षक दिनेश कार्तिक यांच्याकडून झेल सुटला होता. यामुळे भारतीय संघ २८७ चे लक्ष गाठू शकला नाही. पण, कालच्या चुकीवरून धडा घेत रहाणेने आज कुठलीही चुक केली नाही. आणि इशान शर्माच्या फेकलेला चेंडू मलानने फटकारताच रहाणेने झेल घेतला. तीसऱ्या दिवशीच्या खेळात भारतीय संघाने चागली कामगिरी केली. इंग्लंडच्या संघाने ३८ व्या ओव्हरमध्ये १०७ धावा केल्या, आणि यामध्ये त्यांचे ७ खेळाडू बाद झाले.

Trending Now