तैमूरला लवकरच मिळणार भावंड!

शाहीद कपूर आणि मीरा यांना दुसरा मुलगा झाला. तसा विचार आला बाॅलिवूडच्या काही जोड्यांचा. अशातच एका शोमध्ये करिना कपूरनं एक गुपित सांगितलं. कोमल नहाटाच्या एका शोमध्ये करिना कपूर आणि अमृता अरोरा होत्या. नहाटांच्या एका प्रश्नाला करिनानं मनमोकळं उत्तर दिलं. करिनानं सांगितलं की, सैफ आणि ती तैमुरला भावंडं आणण्याचा विचार करतायत.

तैमूर 3-4 वर्षांचा झाला की ते दुसऱ्या अपत्याचा विचार करतील. तैमूरचा जन्म 20 डिसेंबर 2016ला झाला. इंडस्ट्रीतला तो सर्वात लोकप्रिय 'स्टार किड' आहे.

Trending Now