सोनम कपूरनं सांगितला स्टाईल मंत्र!

सोनम कपूरकडे आतापर्यंत फॅशन आयकॉन म्हणून पाहिले गेले आहे. तिच्या एवढं स्टायलिस्ट राहणं प्रत्येक अभिनेत्रीला जमतंच असं नाही

'वूट ओरिजिनल फीट अप विथ द स्टार्स' या शोमध्ये यावेळी भेटीस येणार आहे सोनम कपूर. या शोमध्ये स्टायलिस्ट सेलिब्रिटी अनायाता श्रॉफ अदजानियासोबत बेडवर गप्पा करताना पाहण्याची संधी मिळणार आहे. यावेळी सोनम कपूरनं खूप चांगले सल्ले दिले. ती म्हणाली, स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी जगा.

तेच परिधान करा जे तुम्हाला आरामदायी बनवते. आरोग्यपूर्ण आहार घ्या. लोक आपल्या बद्दल काय मत व्यक्त करतात त्याने तुम्ही आत्मविश्वास गमावू नका.

Trending Now