PHOTOS : राधिकाची इच्छा होणार पूर्ण, शनायाच्या येणार नाकीनऊ

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये तर आता प्रचंड मोठा धमाकाच होणार आहे. गुरूची कंपनी एएलएफ डबघाईस आलीय. कंपनीच्या मालकांनी ही कंपनी विकलीय. अर्थात, ज्यानं जास्त बोली लावलीय त्याला. ही बोली लावलीय राधिकानं. म्हणजेच राधिकानं गुरूची कंपनी टेकओव्हर केलीय. आता इच्छा असो वा नसो गुरूला राधिकाचं स्वागत तर करावं लागणारच. कारण कंपनीच्या मालकांपुढे तो आपली नाराजी दाखवू तर शकत नाही.

राधिकाचा खास मित्र सौमित्रही एवढ्या चांगल्या प्रसंगी येणार नाही असं होणं शक्यच नाही. सौमित्र अमेरिकेतून राधिकाचं यश साजरं करायला भारतात आलाय. सगळे आनंदात आहेत. फक्त चेहरे उतरलेत ते शनाया आणि गुरूचे. शनायाला माझ्या आॅफिसमध्ये टेबल पुसायला लावीन, हे राधिकाचं स्वप्न आता पूर्ण होणार. गुरू आणि शनायाची बाॅस आता राधिका आहे. त्यामुळे तिची ही इच्छा ती नक्की पूर्ण करणार.

Trending Now