किंग खानला का मिळत नाहीत हाॅलिवूड सिनेमे? त्यानंच आणलं सत्य समोर

शाहरूख खान सध्या झीरो सिनेमात बिझी आहे. कतरिना आणि अनुष्कासोबतच्या या सिनेमाचं शूटिंग संपलंय आणि आता पोस्ट प्राॅडक्शनचं काम सुरू आहे. इकाॅनाॅमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यानं आपण हाॅलिवूडला का जात नाही हे सांगितलं. तो म्हणाला मी अॅप्रोच होणार नाही. त्यांना हवं तर मला विचारावं. शाहरूख खान म्हणाला, बाॅलिवूडमध्ये ओम पुरींनी हाॅलिवूड कल्चर सुरू केलं. प्रियांका चोप्रा तर हाॅलिवूडमध्येच आहे. इरफाननंही हाॅलिवूडपट केलेत. अमितजींनी केलेत.

शाहरूखनं इंडस्ट्रीबद्दल महत्त्वाचं विधान केलं. तो म्हणाला, ही इंडस्ट्री पुरुषप्रधान आहे. अभिनेता आणि अभिनेत्रीला सारखी फी मिळाली पाहिजे. पण तसं होतं नाही अजून.

Trending Now