'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये डुप्लिकेट गुरू, राधिकाही अचंबित!

सध्या तमाम मराठी रसिकांच्या समोर एकच प्रश्न पडलाय. या गुरूचं काय होणार? 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत गुरूची परिस्थिती सध्या कठीण आहे. नोकरी कधीही जाऊ शकते.तो काही शनायाला सोडायला तयार नाही आणि राधिकाशी तर त्यानं पंगाच घेतलाय. गुरू म्हणजे अभिजीत खांडकेकर छोट्या पडद्यावरचा आवडता चेहरा. अभिजीत सुरुवातीला रेडिओवर आरजे होता. एका न्यूज चॅनेलमध्ये त्यानं अॅकरिंगसाठी मुलाखतही दिली होती. पण न्यूज मीडियात येता येता तो अचानक वळला मालिकांकडे. ही मुलाखत घेणाऱ्यानं त्याच्यातलं अभिनेत्याचं टॅलेंट ओळखलं होतं. अभिजीतला माझिया प्रियाला प्रीत कळेना ही मालिका मिळाली आणि तो त्याच्या आयुष्यातला टर्निंग पाॅईंट ठरला. ही मालिका तुफान चालली. यातला नायक आणि नायिका यांचं लव्हमॅरेज असूनही दोघांत वितुष्ट येतं. प्रियाला प्रीत कळेपर्यंत मालिकेचा टीआरपी वाढत होता.

दोन्ही मालिकेत त्याच्या व्यक्तिरेखेचं वैवाहिक आयुष्य काही फारसं चांगलं नव्हतंच. पण अभिजीतचं वैयक्तिक आयुष्य मात्र एकदम छान आहे. सुखदा देशपांडे त्याची जोडीदार आहे. ती कथ्थक नृत्यांगना आहे. आणि दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतल्या गुरूला दाक्षिणात्य गुरूही भेटलाय. हो, दक्षिणेकडेही ही मालिका डब केलीय. त्यात भवानी सिंगनं गुरूची भूमिका केलीय. आणि हा भवानी सिंग गुरूला सेटवर येऊन भेटला. कन्नड भाषेत ही मालिका सुरू आहे. आणि तिथल्या नायकाचा लूक गुरूशी मिळताजुळता आहे. अभिजीत खांडकेकर रोमँटिक भूमिका साकारू दे किंवा ग्रे शेडमधली. त्याची लोकप्रियता अबाधित आहे. तरुणींच्या हृदयाची तो धडकन आहे. अभिजीतनं ढाबा भतिंडा आणि ढोलताशे सिनेमातही काम केलंय. पण त्याची ओळख मालिकांमुळेच लोकांमध्ये जास्त आहे.

Trending Now