मुलीचं कौतुक करताना सचिन झाला भावुक; सारा सचिन तेंडुलकर झाली लंडनमधून ग्रॅज्युएट

सारा सचिन तेंडुलकर UCL अर्थात युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधून ग्रॅज्युएट झाली. गांधीजी, रविंद्रनाथ टागोर यांच्यासारखे विद्वान याच युनिव्हर्सिटीमध्ये शिकले. मुलीच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीचे फोटो स्वतः सचिननं ट्वीट केलेत. मुलगी मोठी झाल्याच्या भावना सचिननं कशा व्यक्त केल्यात बघा....

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर UCL अर्थात युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधून ग्रॅज्युएट झाली. त्याचे फोटो स्वतः सचिननं ट्वीट केले आणि मुलीचं कौतुक केलं. सचिन आणि अंजली तेंडुलकर मुलीच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी लंडनला गेले होते. मुलीचं कौतुक करताना सचिननं लिहिलंय - तू लंडनला शिकायला गेलीस ही अगदी कालची गोष्ट वाटते. मला आणि अंजलीला तुझा खूप अभिमान आहे. जग जिंकण्यासाठी शुभेच्छा सारा! सचिनच्या ट्वीटमधून त्याला मुलीबद्दलचं असलेलं कौतुक दिसतंय. UCL ही लंडनमधली जुनी आणि प्रतिष्ठित शिक्षणसंस्था आहे. महात्मा गांधी, रविंद्रनाथ टागोर आणि अनेक नोबेल पुरस्कार विजेते विज्ञान या संस्थेत शिकलेले आहेत.

साराचं कौतुक करणारं सचिनचं ट्वीट व्हायरल झालंय. UCL नेसुद्धा ते रिट्वीट केलंय.  क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच प्रसारमाध्यमांची आवडती राहिली आहे.  अंबानी कुटुंबियांतील कोणता कार्यक्रम असो किंवा सोशल मीडिया सचिनची मुलगी सारा हल्ली नेहमीच चर्चेत असते. अंजलीही तिच्या स्टाईल स्टेटमेन्टसाठी अनेकदा लाईम लाईटमध्ये असते. साराकडे पाहून तिला हा फॅशन सेन्स आई अंजली तेंडुलकरकडून मिळाला याची खात्री पटते. फॅशनच्या बाबतीत सारा प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देते. मग ते मॅचिंग चपला असो किंवा ड्रेसला साजेशी हेअर स्टाईल. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये सारा ऑफ शोल्डर टॉपसोबत जीन्स, वेगवेगळ्या रंगाचे वनपीस घातलेली दिसत आहे. 20 वर्षीय सारा जेवढी सुंदर भारतीय पेहरावात दिसते तेवढीच सुंदर ती पाश्चिमात्य पेहरावतही दिसते यात काही शंका नाही फॅशन सेन्सच्या बाबतीत सारा बॉलिवूड किड्स सारा अली खान, अनन्या पांडे, जान्हवी कपूर यांच्यापेक्षा काही कमी नाही. अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये आणि पार्टीमध्ये सारा आवर्जुन दिसते. ती आल्यावर प्रसारमाध्यमांचे कॅमेरे आपसुक तिच्याकडे वळतात. साराचे इन्स्टाग्रामवर अनेक फॉलोवर्स आहेत. लोकांना तिचा साधेपणा आणि तिचा ड्रेसिंग सेन्स फार आवडतो.

Trending Now