बिग बाॅस 12 गोव्यात, सलमाननं पहिल्या जोडीचं नाव केलं घोषित

बिग बाॅस 12चं लाँच गोव्यात झालंय. तिथे सलमान खाननं बिग बाॅसच्या घरात जाणाऱ्या पहिल्या जोडीचं नाव घोषित केलंय. यावेळी या घरात काही रिअल लाईफ जोड्या एकत्र दिसतील असं आधीच जाहीर करण्यात आलंय. यात तीन जोड्या या सेलिब्रिटीज असतील तर तीन सर्वसामान्य असतील. मात्र घरात जाणाऱ्या या जोड्या चांगल्याच मालामाल होणारेत. सलमाननं कुणाचं नाव घोषित केलं ठाऊकेय? काॅमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष. दोघांचं काही दिवसांपूर्वी लग्न झालंय.

यावेळी भारती म्हणाली, मला हा शो जिंकायचाय. भले हर्ष घराबाहेर गेला तरी चालेल.त्याला घराबाहेर बरंच काम आहे. भारतीबरोबर अभिनेत्री दीपिका कक्कडही यात असेल. 16 सप्टेंबरपासून हा शो सुरू होतोय.

Trending Now