फक्त शनायाच नाही 'हेही' कलाकार बदलले होते!

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून शनायाची एक्झिट होणार. आता तिच्या जागी कोण ही एकच चर्चा सुरू आहे. शनाया ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडतेय. आता ही मालिका संपवणार की नवी शनाया आणणार हा प्रश्न आहेच. महत्त्वाच्या व्यक्तिरेखेची रिप्लेसमेंट होणं हे काही नवं नाही. हिंदी मालिकांमध्ये हा फंडा अनेकदा पाहायला मिळालाय. तुम्हाला आठवत असेल सांस भी कभी बहू थी ही जुनी मालिका. 11 वर्ष चालली होती. प्रचंड हिट. जवळजवळ 11 वर्ष ही मालिका चालली होती. यातल्या तुलसी म्हणजेच स्मृती इराणीचा नवरा अमर उपाध्याय अचानक बदलला होता. त्याच्या जागी रोनित राॅय आला. मालिका एकदम भरात होती. तेव्हा हे बदल झाले होते. पण त्याचा मालिकेवर फारसा परिणाम झाला नाही. 'कुमकुमभाग्य' मालिकेत मृणाल ठाकूरच्या जागी काजोल श्रीवास्तव आली. पण मालिकेवर फारसा परिणाम झाला नाही.

देवयानी एकदम हिट होती तेव्हा शिवानी सुर्वे काम करत होती.आणि अचानक तिच्या जागी दुसरी मुलगी आली. ही रिप्लेसमेंट एकदा नाही तर चारदा करावी लागली. तरीही या मालिकेच्या लोकप्रियतेवर फार परिणाम नव्हता झाला. म्हणजे एक नक्की प्रेक्षक मालिकेच्या कथानकाला जास्त महत्त्व देतात आणि पात्रांचे बदल सहज स्वीकारतात.

Trending Now