फाटलेल्या नोटांचे नियम 'RBI'ने बदलले, आता याच नोटा होणार 'EXCHANGE'

08 सप्टेंबर : भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) ने फाटलेल्या नोटा बदलण्याचे नियम बदलले आहेत. नवीन नियमांनुसार, 2000 रुपये, 200 रुपये आणि अन्य कमी मूल्याच्या नोटा बाजारात आल्यानंतर हे पाऊल ऊचलण्यात आलं आहे. वर्ष 2016 च्या नोव्हेंबरमध्ये नोटबंदीनंतर रिझर्व बँकेने 200 रुपये आणि 2,000 रुपयांच्या नोटा वापरात आणल्या. या व्यतिरिक्त 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये आणि 500 रुपयांच्याही नव्या नोटा छापण्यात आल्या. आरबीआयनुसार, 50 रुपये आणि त्यापेक्षा अधिक मूल्य असलेल्या नोटा किती वेळ चलनात असू शकतात याबद्दलच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

नवे नियम : फाटलेल्या नोटा तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या देश भर असलेल्या अधिकृत कार्यालयात जाऊन बदलू शकता. फाटलेल्या नोटेच्या स्थितीनुसार ठरवलं जाईल की त्याबदल्यात तुम्हाला त्य़ाची किती टक्के रक्कम मिळेल. नवीन सीरिजच्या या जुन्या सीरिजच्या नोटापेक्षा लहान आहेत. त्यामुळे त्यानुसार तुम्हाला नोटांचा मोबदला मिळणार. 50 रुपयांपेक्षा कमी मुल्याच्या फाटलेल्या नोटांचे संपूर्ण पैसे तेव्हा मिळतील जेव्हा त्याचा सगळ्यात मोठा फाटलेला तुकडा यासारखा असेल. जर 50 रुपये आणि त्यापेक्षा जास्त मूल्य असलेल्या फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी प्रत्येक फाटलेल्या तुकड्याचे क्षेत्र हे संपूर्ण नोटेच्या क्षेत्राच्या 40 टक्के असलं पाहिजे.

Trending Now