रवी शास्त्री पुन्हा एकदा 'बाॉलिवूड'च्या प्रेमात!

क्रिकेट आणि बॉलिवूडचं कनेक्शन जुनं आहे. 'विरुष्का'च्या पाठोपाठ आता इंडियन कोच बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय.... दुसऱ्यांदा! कोण आहे ती अभिनेत्री?

बॉलिवूड कलाकारांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं पहिलापासूनच एक वेगळं कनेक्शन आहे. विराट-अनुष्काचं ताजं उदाहरण तुमच्यासमोर आहे. विराट तर अनुष्कासोबत लग्न करुन मोकळा झाला. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की त्याच्या फेवरट कोचने देखील त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. गेल्या एका वर्षापासून भारतीय संघाची धुरा सांभाळणाऱ्या रवी शास्त्रीचे देखील बॉलिवूडमधल्या एका अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याची चर्चा सुरू आहे.

याआधी देखील रवी शास्त्रीचं एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अफेअर खूप गाजलं होतं. ती अभिनेत्री म्हणजे सैफ अली खानची पहिली बायको अमृता सिंग. बऱ्याच काळानंतर आता रवी शास्त्री निमरत कौरला डेट करत असल्याची चर्चा सगळीकडे आहे. द लंचबॉक्समध्ये इरफान खानसोबत काम केल्यानंतर ती अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट या चित्रपटात झळकली. दोन वर्षापूर्वी एका कार लाँचवेळी रवी शास्त्री आणि निमरत यांची पहिली भेट झाली होती.

Trending Now