रणवीरच्या चित्रविचित्र पोशाखांमागचं काय आहे गुपित?

Sonali Deshpande
अभिनेता रणवीर सिंग म्हटलं की आठवते ती त्याची फॅशन. रणवीर तऱ्हेतऱ्हेचे पोशाख घालतो. चित्रविचित्र रंगांच्या पोशाखामुळे तो नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय. फॅशनच्या स्टाइलसाठी त्याला मेहनत घ्यावी लागते का? यावर रणवीर सिंगचं उत्तर नाही असं आहे. त्यामागची काही गुपितंही तो शेअर करतो. रणवीर म्हणतो, शाळा-काॅलेजमध्ये असतानाच मला रंगीत कपडे घालायची आवड होती. केसांच्या स्टाइलला तो पोशाख मिळताजुळता घालायचा.

तो म्हणाला, मी अभिनेता बनलो आणि मिळणारी लोकप्रियता कशी हाताळायची ते मला कळेना. मी लोकांच्या अपेक्षेप्रमाणे वागायला लागलो. रणवीर म्हणतो, करियरच्या सुरुवातीला मी जे काही करायचो, ते मला फार आवडायचं असं नाही.

Trending Now