बर्थडे स्पेशल : दीपिका रणवीरला काय देणार गिफ्ट?

Sonali Deshpande
आज अभिनेता रणवीर सिंग आपला 33वा वाढदिवस साजरा करतोय. सध्या रणवीर सिंबा सिनेमाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये बिझी आहे. हा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी दीपिकाने प्लॅनिंग केलं आहे. टाइम्स नाउ मध्ये छापलेल्या एका रिपोर्टनुसार दीपिकाने आजच्या दिवसासाठी विशेष प्लॅन केला आहे आणि तिने आजचा संपूर्ण दिवस रणवीरसोबत घालवण्याचे ठरवले आहे.

दीपिकाच्या वाढदिवसाला रणवीर तिला मालदिवला घेऊन गेला होता. म्हणून दीपिकाने रणवीरसाठी हैदराबादला जाणे आलेच. ह्या सुंदर जोडीच्या लग्नाबद्दल सर्वत्र चर्चा आहे. म्हटलं जातंय की ह्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये विवाहबद्ध होणार आहेत. हे लग्न इटलीत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबईत एक दिमाखदार रिसेप्शनही ठेवले जाणार आहे. विवाह कुठेही झाला तरी 'दीपवीर' फॅन्ससाठी हा मोठा इव्हेंट असणार आहे.

Trending Now