...म्हणून माझं रणबीरशी ब्रेकअप झालं होतं - दीपिका पदुकोण

रणबीर कपूर आणि दीपिका यांची जोडी पडद्यावर जशी चांगली दिसते, तशीच नेहमीच्या आयुष्यातही. दोघांचं अफेअर होतं, हे तर सगळ्यांना माहीत आहे. पण आज तकशी बोलताना दीपिकानं रणबीरसोबत आपलं ब्रेकअप का झालं, हे सांगितलंय. दीपिका म्हणते, मी रणबीरला रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतरच मी सर्व भावना बाजूला ठेवून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दीपिका म्हणते, प्रेमात फक्त शारीरिक जवळीक जरुरी नसते. तर मनं जुळावी लागतात. एकमेकांना समजून घ्यावं लागतं. पण सगळे असा विचार नाही करत.

दीपिका म्हणते, मला अगोदर सांगितलं गेलं की तो धोका देतोय, पण मी दुर्लक्ष केलं. पण नंतर सगळंच असह्य झालं आणि मी एकटंच राहणं पसंत केलं. दीपिका खूप दुखावलेली आहे. ती म्हणते, रिलेशनशिपमध्ये आपण जेव्हा सर्व काही झोकून देतो आणि नंतर आपल्याला धोका मिळतो, तेव्हा आपण आतून तुटून जातो. सगळं संपून जातं. मी या अनुभवातून गेलीय. माझं ब्रेकअप झाल्यावर मी बरेच दिवस रडत होते. खूप भयाण होतं सगळं. पण नंतर मी एक चांगली व्यक्ती बनून पुढे आले. दीपिका आणि रणबीर 2007मध्ये बचना ये हसीना सिनेमातून एकमेकांच्या जवळ आले होते. तिथून त्यांचं अफेअर सुरू झालं होतं. दीपिकानं रणबीरच्या नावाचा टॅटूही काढला होता. आता दीपिका आणि रणवीर सिंग लग्न करतायत. तर दुसरीकडे रणबीर-आलिया डेटवर जातायत. लाईफ गोज आॅन, एवढं नक्की.

Trending Now