PHOTOS : देशाचा प्रमुख हा राजा असावा, व्यापारी नसावा!;राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

10 सप्टेंबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारत बंदबाबत वर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच त्यांनी भाजप सरकारवरही चांगलाच असूड ओढला. मनसेचे कार्यकर्त्यांनी उत्तम बंद पाळला, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचं केलं अभिनंदन काँग्रेसच्या काळात पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ झाली तेव्हा भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करत भाव कमी का करत नाही असा सवाल केला होता

- नोटबंदी फसली म्हणून इंधन दरवाढ करून सर्वसामन्यांच्या खिश्यातून पैसे काढताय शिवसेनेला स्वत:ची भूमिका नाही - शिवसेनेचे पैसे अडले की शिवसेना सरकारचा पाठिंबा काढण्याची धमकी देते आणि पैसे मिळाले की गप्प बसते त्यामुळे शिवसेना काय म्हणते त्याला मी किंमत देत नाही  काँग्रेसपेक्षाही भाजप वाईट आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा देशासाठी त्याहुन वाईट - देशाचा प्रमुख हा राजा असावा व्यापारी नसावा शिवसेनेला स्वत:ची भूमिका नाही. पैसे बाहेर मिळाले नाही की सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देतात आणि पैसे मिळाले की सत्तेत राहतात - काँग्रेसने ज्या चुका केल्यात, त्या आहेच. पण या सरकारनेही खड्डा खोदलाय तो काही कमी नाही - नोटबंदी फसली म्हणून इंधन दरवाढीतून पैसे लुटले जात आहे आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आली. भाजपने मुद्दामहुन गुन्हे दाखल केले. उद्या हे तुमच्यावरही अंगलट येणार आहे - इतक्या विहिरी खोदल्या, राज्य हागणदारीमुक्त केलं असं सांगताय मग सकाळी बसतात ते काय मोरं आहे का ?

Trending Now