PHOTOS : बाप्पाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज; बाजारपेठ सजली

भाद्रपद महिन्यात राखी पौर्णिमा आणि दही हंडी हे सण झाले की वेध लागतात ते लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे. सार्वजनिक ठिकाणी तसेच घरोघरी लाडक्या बाप्पाची स्थापना करण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. पुण्यातल्या मंडई परिसर विविध आकाराच्या आकर्षक गणेशमुर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. तर श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी विविधरंगी मखर आणि इतर साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.

गणपती बाप्पाच्या मूर्ती प्रमाणेच गौरीचे आणि बाळांचे सुरेख मुखवटे देखील मन मोहून घेत आहेत. आज सर्वत्र पोळा साजरा झाला. यानिमित्त बाजारपेठेत मातीच्या बैलजोडी विक्रीसाठी उपलब्ध होत्या. सजावटीच्या साहित्याने पुण्यातीला मंडई परिसर असा फुलून गेला आहे. सुट्टीचे दिवस साधत शनिवार आणि रविवारी गणेशभक्तांनी जावटीचे साहित्य खरेदी करण्यासीठी बाजारपेठेत गर्दी केली होती. श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालीका आहे. त्यासाठी विविध सुगंधी फुले आणि पत्र्यासुद्धा मंडईत दाखल झाल्या आहेत. श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालीका आहे. त्यासाठी विविध सुगंधी फुले आणि पत्र्यासुद्धा मंडईत दाखल झाल्या आहेत. गणेशोत्सव म्हटला की रोषणाई ही आलीच. दिव्यांची माळ आणि रोषणाईसाठी लागणारे रंगबिरंगी दिवे गणेशभक्तांना आकर्षीत करीत आहेत.

Trending Now