ऑनलाइन पार्टनर शोधताय... मग या गोष्टी नक्की वाचा

इंटरनेट आणि स्मार्ट फोनच्या या जमान्यात शॉपिंगपासून रिलेशनशिपपर्यंतच्या सर्व गोष्टी ऑनलाइन व्हायला लागल्या आहेत. देशतील अनेक राज्यांमध्ये ऑनलाइन पार्टनर शोधण्यात येत आहेत. याचा सगळ्यात जास्त फायदा हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला पूर्ण ओळखू शकता. पण या सगळ्यात फसवणूक, पैसे उकळण्याचे प्रकार समोर येतात. हे सर्व प्रकार मुलींबाबत अधिक प्रमाणात होतात. त्यामुळे जर मुली ऑनलाइन पार्टनर शोधत आहेत तर त्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. ऑनलाइन पार्टनरला होकार देण्याआधी पुढील गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. खासगी गोष्टी शेअर करण्याची घाई करू नका- ऑनलाइन पार्टनरच्या शोधात असताना या गोष्टीची जास्त काळजी घ्या तुम्ही समोरच्याच्या कितीही प्रेमात असाल तरी त्याला घरचा पत्ता, फोन नंबर अशा आपल्या खासगी गोष्टी सांगायची घाई करु नका. असे केल्यास तुम्हीच अडचणीत येऊ शकता. शिवाय सुरूवातीला सुरक्षित अंतर ठेवूनच चॅट करा. फोटो शेअर करु नका- जोपर्यंत समोरच्याला तुम्ही पूर्ण ओळखत नाही तोवर तुमचे फोटो त्या व्यक्तीला शेअर करु नका. तसेच ऑनलाइन सुरू झालेल्या मैत्रीला फार गांभिर्याने घेऊ नका.

पहिली भेट- ऑनलाइन ओळख झालेल्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटायला जात असाल तर सोबत कोणी नातेवाईक किंवा विश्वासू मित्र- मैत्रिणीला नक्की घेऊन जा. तसेच भेटीसाठी शक्यतो सार्वजनिक जागेचीच निवड करा. विचारपूर्वक लग्नाचा विचार करा – ऑनलाइन डेटिंगनंतर अनेकजण त्यांचे नातं पुढे नेऊन लग्न करण्याचा निर्णय घेतात. लग्नानंतर समोरच्या व्यक्तीने फसवल्याचे समोर येते. यामुळेच लग्नाचा निर्णय घेताना अजिबात घाई करु नये. सगळ्या गोष्टी पडताळून घ्याव्यात आणि खात्री वाटली तरच लग्नाचा विचार करावा. चॅटिंग करताना विशेष सावधानी बाळगा- कोणासोबतही ऑनलाइन चॅटिंग करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नाही तर अयोग्य व्यक्ती तुमच्यासोबत केलेल्या चॅटिंगचा गैरउपयोग करु शकतो.

Trending Now