PHOTOS : 'ही' अभिनेत्री घेणार 'शनाया'ची जागा !

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून शनायाची अखेर एक्झिट झालीये. आता तिच्या जागी कोण घेणार ?, गुरुची नवीन गर्लफ्रेंड कोण असणार ?, अशी चर्चा रंगली होती. आता अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळालाय. शनायाच्या जागा आता ईशा केसकर घेणार आहे. येत्या रविवारी प्रसारित होणाऱ्या भागामध्ये ईशाची धमाकेदार एंट्री होणार आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या नावाने सुरू झालेली मालिका नावानेच लोकप्रिय झाली पण यातील शनाया, राधिका आणि गुरू ही पात्र प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीत पडली.

शनायाची ग्रे शेड असूनही ती लोकांना आवडायची. तिचं माॅडर्न लूक, मूर्खपणा, मध्येच अल्लडपणा हे सगळं प्रेक्षकांना आवडतं होतं. आता शनाया रिप्लेसमेंट होणार म्हटलं तर मग तिची जागा कोण घेणार की मालिका गुंडाळणार अशी चर्चाही रंगली होती. शनाया ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडायची आता या मालिकेत तिची जागा ईशा केसकर घेणार आहे. ईशा केसकर याआधी जय मल्हार मालिकेत बानूची भूमिका साकारायची . आता माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत गुरूची गर्लफ्रेंडची भूमिका साकारणार आहे. असो. एकूणच या मालिकेत आता बऱ्यात उलथापालथी होणार आहेत.

Trending Now