PHOTOS : ब्ल्यू बाॅटल जेलीफिश चावल्यावर 'हा' उपचार आधी करा

मुंबई, 31 जुलै : चौपाटीच्या किनाऱ्यांवर सध्या पाण्यातून वाहून आलेले जेलिफिश आढळून आले असून त्याचा डंख विषारी असला तरी त्यापासून धोका नाही. मात्र, चौपाटीवर फिरायला गेल्यानंतर शक्यतो समुद्राच्या पाण्यात उतरू नये, असं आवाहन मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे यांनी केलं आहे. मुंबई परिसरातील समुद्राच्या किनारपट्टीवर काही प्रजातीचे मासे प्रजननासाठी तसंच अन्नाच्या शोधात येतात. काही प्रजाती वजनाने हलक्या असल्याने वाहून समुद्रकिनाऱ्यावर येतात. यामध्ये जेलीफिश, ब्लू जेली, ब्लू बाॅटल, मेडोसा, पोर्तीगीज मॅन ऑफ वार, पॉरपिटा आदींचा समावेश आहे.

परंतु, यामुळे घाबरण्याचे कारण नाही. अशी घटना घडल्यास त्यावर व्हिनेगर चोळावे तसंच थोडे गरम पाण्याने चोळल्यास वेदनेची तीव्रता हळूहळू कमी होते. अधिक त्रास होत असल्यास जवळच्या दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावा, असं आवाहनही करण्यात आले आहे.

Trending Now