PHOTOS: गायीच्या पोटातून काढला प्लास्टिक,लोखंडासह तब्बल ५० किलो कचरा

कुठल्याही प्रकारचा कचरा मग तो प्लास्टिक असो,लोखंडी,की रबरी हा कचरा कुंड्यावर न टाकता तो इतरत्र टाकणे हे जनावरांसाठी किती हानिकारक आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय.

पंकज क्षीरसागर, परभणी, 28 आॅगस्ट : कुठल्याही प्रकारचा कचरा मग तो प्लास्टिक असो,लोखंडी,की रबरी हा कचरा कुंड्यावर न टाकता तो इतरत्र टाकणे हे जनावरांसाठी किती हानिकारक आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय. परभणीच्या पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालयातील दवाखान्यात डॉक्टरांनी आणि विद्यार्थ्यांनी शहरातील एका लाल कंधारी गायीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. तिच्या पोटातून तब्बल ५० किलो प्लास्टिक कचरा,लेदर च्या दोऱ्या,पैश्याचे नाणे,लोखंडी कचरा आदीबाहेर काढलाय.

रामेश्वर वाघमारे यांची गाय अनेक दिवसांपासून काहीच खात नव्हती, त्यामुळे त्यांनी आज या गायीला शहरातील पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालयांतील दवाखान्यात दाखवले. असता तिच्या पोटात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा गोळा असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ या गायीवर शस्त्रक्रिया केली आणि तिच्या पोटातून ही घाण बाहेर काढली. ज्यामुळे गायीचे प्राण वाचले आहेत.ही शस्त्रक्रिया प्रा गजानन ढगे,डॉ स्वप्नील जाधव,चैत्राली आव्हाड यांनी केलीय.

Trending Now