जगज्जेत्या इम्रान खानला ११ भारतीयांनी चारली होती धूळ

पाकिस्तानात नुकत्याच पार पडलेल्या मतदानात जनतेचा कल इम्रान खान यांच्या पक्षाला अधिक असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तान तेहरिफ ए इन्साफ (पीटीआय) हाच पक्ष पाकिस्तानमध्ये मोठ्या संख्येने निवडून येईल असे म्हटले जात आहे. एकीकडे इम्रान खानचा पक्ष पाकिस्तानाची धूरा सांभाळायला सज्ज झाला आहे. सध्या विजयाची चव चाखणाऱ्या इम्रान यांना १९९२ मध्ये भारताच्या ११ खेळाडूंनी पराजीत केले होते. हे ११ खेळाडू दुसरे कोणी नसून १९९२ ची भारतीय क्रिकेट टीम आहे. १९९२ चा वर्ल्ड कप पाकिस्तानने जरी जिंकला असला तरी त्या वर्ल्डकपमध्ये भारतासमोर पाकिस्तानला हार पत्करावी लागली होती. भारत- पाकिस्तानमधील सामन्यात अजय जडेजाने ४६ धावा केल्या होत्या. अजय जडेजाच्या जोडीला फलंदाज श्रीकांतची योग्य साथ लाभलेली. श्रीकांतने पाकिस्तानचा फलंदाज आमिर सोहेलची विकेट घेतली. तेव्हा सोहेल ६२ धावांवर होता.

भारतीय संघाटा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने ३२ धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकरने या सामन्यात नाबाद ५४ धावा केल्या. तर विनोद कांबळी २४ धावा करुन बाद झाला. क्षेत्ररक्षक किरण मोरे यांनी ताशेरे ओढले. अखेर प्रोवोक होऊन मियांदाद बाद झाले. संजय मांजरेकर जरी शुन्यवर बाद झाला असला तरी त्याने मोईन खानचा झेल पकडून संघाला मोलाची मदत केली. मोईन खानचा झेल हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. कपिल देव यांनी २६ चेंडूत २ गडी बाद करुन ३५ धावा दिल्या. मनोज प्रभाकर यांनी उत्तम गोलंदाजी केली. त्यांनी २२ धावांमध्ये पाकिस्तानचे २ गडी बाद केले. श्रीनाथ आणि व्यंकटपती राजू यांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केला. भारताने या सामन्यात पाकिस्तानसमोर २१६ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पाकिस्तान १७३ धावांमध्येच ऑल आऊट झाला.

Trending Now