Birthday Special : जेव्हा आमिरच्या सिनेमातून अक्षयला बाहेर काढलं होतं

आज अक्षय कुमारचा वाढदिवस. पण त्याच्या आयुष्यातला संघर्ष खूप मोठा आहे. सुपरस्टार अक्षय कुमारला आज भले कितीही डोक्यावर घेऊ देत. पण एक काळ असा होता, कुठलीच हिराॅइन त्याच्या बरोबर काम करायला तयार नव्हती. कुठलाच दिग्दर्शक अक्कीला आपल्या सिनेमात घ्यायला राजी नसायचा. त्यानं खूप नकार पचवलेत. आमिर खानच्या जो जिता वही सिकंदर सिनेमासाठी अक्षय कुमारनं आॅडिशन दिली होती. शेखर मल्होत्राच्या भूमिकेसाठी.

मन्सूर खानना अक्षयचा अभिनय आवडला नाही. त्यांनी त्याला नाकारलं. त्याच्या जागी दीपक तिजोरी आला. सुरुवातीला नकार पचवणारा अक्की आता बाॅलिवूडवर राज्य करतोय. मैं खिलाड़ी तू अनाड़ी, हेरा-फेरी, धड़कन, अंदाज, भूल भुलैय्या, जॉली एलएलबी, टॉयलेट एक प्रेमकथा असे एकापेक्षा एक हिट सिनेमे अक्षयनं दिले. लवकरच अक्षय रजनीकांतबरोबर 2.0 सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत तो आहे.

Trending Now