शनायानंतर आता गुरूची नवी गर्लफ्रेंड कोण?

शनायाची माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून एक्झिट होणार, ही बातमी आल्यावर अनेक चर्चा सुरू झाल्या. राधिका, शनाया आणि गुरू या तिघांची ही कथा पाहायला सगळ्यांनाच आवडते. शनायाची ग्रे शेड असूनही ती लोकांना आवडते. तिचं माॅडर्न लूक, मूर्खपणा, मध्येच अल्लडपणा हे सगळं प्रेक्षकांना आवडतं. आता ही रिप्लेसमेंट होणार म्हटलं तर मग तिची जागा कोण घेणार की मालिका गुंडाळणार अशी चर्चाही सुरू झाली. खरं तर शनायाच्या जागी मालिकेला तरुण आणि नवा चेहरा हवा. शनाया म्हणजे रसिका सुनील हा टीव्हीसाठी पूर्ण वेगळा चेहरा होता. रसिकाचं आडनाव दाभडगावकर. ती गायिकाही आहे. ती शास्त्रीय गाणं शिकलीय. अजय अतुलच्या काॅन्सर्टमध्ये तिनं गाणं गायलंय. ती डान्सरही आहे.

एखादी माहीत नसलेली माॅडेल असू शकेल. पण माॅड लूक, चेहऱ्यावर बेफिकिरी, लडीवाळपणा असे सगळे गुण तिच्यात हवेत. ती थोडी इंग्राजळलेलीच हवी. पण स्मार्टनेसही मूर्खपणाकडे झुकणारा हवा. असो. एकूणच या मालिकेत आता बऱ्यात उलथापालथी होणार आहेत. कोर्ट केस जरी राधिकानं जिंकली तरी चर्चेत राहणार आहे ती शनायाच!

Trending Now