Birthday Special : नेहा धुपियानं सुरुवातीला अंगदला दिला होता नकार

नेहा धुपिया सध्या गरोदर असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. आज तिचा वाढदिवसही आहे. नेहा आणि अंगद बेदीची प्रेमकहाणीही रंजक आहे. नेहा आणि अंगद एकमेकांच्या प्रेमात आहेत, हे लक्षात आलं सिनेमांच्या वेळी. तुम्हारी सुलू रिलीज झाल्यानंतर अंगदनं सोशल मीडियावर नेहाचं कौतुक केलं होतं. नेहानंही टायगर जिंदा है सिनेमाच्या वेळी अंगदचं अभिनयाचं कौतुक केलं होतं.

मग एक दिवस बातमी आली, दोघांनी गुरुद्वारात जाऊन लग्न केलं. अंगद नेहाच्या प्रेमात पडला होता. पण नेहा त्याच्यात अजिबात रस घेत नव्हती. एका मुलाखतीत अंगद म्हणाला होता, ' मी अण्डर 19 क्रिकेट खेळत होतो, तेव्हाच नेहाच्या प्रेमात पडलो होतो. ती जिममध्ये यायची. पण मला तिचं नाव माहीत नव्हतं.' मग हळूहळू दोघांची ओळख, नंतर मैत्री आणि मग प्रेम अशा गोष्टी घडत गेल्या. सुरुवातीला अंगदला नकार देणारी नेहा आज त्याच्या प्रेमात आकंठ बुडालीय. अंगद क्रिकेटर बिशनसिंग बेंदींचा मुलगा. माॅडेलिंग आणि अभिनय करतो. आणि आता तर दोघांनी गुड न्यूज दिलीय. नेहा-अंगद आईबाबा बनणार आहेत.

Trending Now