10 वर्षांच्या डेटिंगनंतर वरुण धवन चढणार बोहल्यावर

वरूण धवन हा बाॅलिवूडचा एक चांगला अभिनेता. स्टुडंट आॅफ द इयर,बदलापूर,आॅक्टोबर असे सिनेमे त्यानं गाजवले. त्याची कधीच कोणाशी लिंक जोडली गेली नव्हती. म्हणूनच सगळ्यांना प्रश्न पडलाय त्याची गर्लफ्रेंड कोण? बातमी अशी आहे की, वरूण धवन गेली 10 वर्ष डेट करतोय. त्याच्या आयुष्यात गेली 10 वर्ष एकच व्यक्ती आहे. ती आहे नताशा दलाल. फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीत वरूणचं म्हणणं आहे, नताशा माझ्यावर अभिनेता म्हणून प्रेम करत नाही. आमच्यातले बंध मजबूत आहेत..

वरूण आणि नताशा लग्न करणार आहेत. पण त्याला थोडा वेळ आहे. वरुण म्हणाला, माझं पहिलं प्रेम सिनेमा आहे. पण लवकरच तुम्हाला लग्नाबद्दल कळेल. वरुणनं बदलापूर, आॅक्टोबर हे सिनेमे नताशाच्या सांगण्यावरून केले होते.

Trending Now