PHOTOS : राज ठाकरेंच्या घरी झालं रक्षाबंधन साजरं

आज सगळीकडे रक्षाबंधन उत्साहात सुरू आहे. सर्वसामान्यांप्रमाणे राजकारणी, कलाकार सगळेच रक्षाबंधनाचा सण साजरा करतायत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरीही रक्षाबंधन जोरदार साजरं झालं. राज ठाकरेंच्या भगिनी जयवंती ठाकरे यांनी आपल्या भावाला राखी बांधली. राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे यांनीही रक्षाबंधन साजरं केलं.

आपला भाऊ अमित ठाकरे यांना उर्वशी ठाकरेंनी राखी बांधून आनंदात आणखी भर पाडली. रक्षाबंधनाला बहीण राखी बांधून भावावरचं प्रेम व्यक्त करते. भाऊ तिला प्रेमाची भेट देतो. राज ठाकरेंच्या घरी रक्षाबंधनाचा सोहळा खूप आनंदात पार पडला.

Trending Now