PHOTOS : लाॅर्डसवर धोनी-विराटसमोर गर्लफ्रेंडला केलं प्रपोझ

प्रेक्षकांमध्ये एका भारतीय तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडला चक्क प्रपोझ केलं. मैदानावरच्या मोठ्या स्क्रीनवर सगळ्यांनी ते पाहिलं.

काल लाॅर्डसवर झालेल्या भारत-इंग्लड क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव झाला. क्रिकेट प्रेमी निराश झाले. पण लाॅर्डसवर एक वेगळा नजारा पाहायला मिळाला. प्रेक्षकांमध्ये एका भारतीय तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडला चक्क प्रपोझ केलं. मैदानावरच्या मोठ्या स्क्रीनवर सगळ्यांनी ते पाहिलं. त्यानं प्रपोझ केल्यानंतर तिनं होकार देईपर्यंत डिसिजन पेंडिंग असंही स्क्रीनवर झळकलं. नंतर त्या गर्लफ्रेंडनं होकार दिल्यानंतर तरुणानं तिला अंगठी घातली. मैदानातल्या प्रेक्षकांनी टाळ्या तर वाजवल्याच. पण इंग्लड आणि भारतीय खेळाडूंनी मॅचही थोड्या वेळ थांबवली होती. आणि या सुंदर क्षणांचे साक्षीदार बनले. लेग स्पिनर युजवेंद्र चहलही टाळ्या वाजवताना पाहायला मिळाला.

Trending Now