PHOTO : LGBT सेलेब्रिटींच्या यादीत आणखी कोण कोण?

पाहा जगभरातल्या अशा व्यक्ती ज्यांनी जाहीरपणे आपण LGBT असल्याचं सांगितलंय... समलैंगिकता हा भारतात गुन्हा नाही, असं सुप्रीम कोर्टानं गुरुवारी सांगितलं आणि LGBT समुदायानं जल्लोष केला. भारतात आपण गे आहोत असं जाहीरपणे सांगणाऱ्या व्यक्ती आतापर्यंत कमी होत्या. आता कलम ३७७नुसार समलैंगिकता गुन्हा ठरणार नसल्यामुळे कदाचित ही संख्या वाढेल.

समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय गुरुवारी सकाळी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि भारतातली LGBT कम्युनिटीनं जल्लोष केला. उघडपणे बायसेक्शुअल किंवा गे असल्याचं मान्य करणारे आतापर्यंत कमी होते. कदाचित आता ही संख्या वाढू शकते. जगभरातल्या अशा LGBT सेलेब्रिटींबद्दल कम्युनिटीविषियी - हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली हिने काही चित्रपटांमध्ये लेस्बियन भूमिका केल्या. आपण खऱ्या आयुष्यातही बायसेक्शुअल असल्याचं अँजेलिनानं मध्यंतरी जाहीर केलं होतं. अभिनेता ब्रॅड पिट याच्याशी लग्न झाल्यानंतर तिने ही गोष्ट जाहीर केली. हे दोघं बरीच वर्षं रिलेशनशिप होते आणि नुकताच त्यांनी काडीमोड घेतलाय. 

अमेरिकेची मार्टिना नवरातिलोवा ही टेनिस स्टार लेस्बियन असल्याचं जाहीरपणे मान्य करते. एवढंच नाही तर तिने तिच्या पार्टनरबरोबर लग्नही केलं आणि त्या दोघींचे फोटो त्या वेळी चांगलेच व्हायरल झाले होते. वयाच्या ४०व्या वर्षानंतरही मार्टिना ग्रॅंडस्लॅम खेळत होती. मूळची चेक प्रजासत्ताकची मार्टिना नवरातिलोवा करिअरच्या नंतरच्या टप्प्यात अमेरिकेत स्थायिक झाली.  अॅपल कंपनीचे सीईओ टीम कुक हे गे असल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलंय. जगातल्या एवढ्या मोठ्या आणि प्रसिद्ध कंपनीच्या सर्वोच्च स्थानी असणारा माणूस LGBT समुदायातला असल्याची आणि ते जाहीरपणे त्यानं मान्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. बॉलिवूडमध्ये बॉबी डार्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या या सेलेब्रिटीचं खरं नाव हे पंकज शर्मा आहे. अनेक चित्रपटांमध्ये तिने गेची भूमिका साकारली आहे. LGBT समुदायाचं बॉबी समर्थन करते. क्रिस्टीन स्टुअर्ट ही प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आता दिग्दर्शकसुद्धा बनली आहे. ट्वायलाईट सागामधली तिची बेला गाजली होती. आपण 'गे' असल्याचं ती जाहीरपणे मान्य करते. समलिंगी स्त्रियांसाठी लेस्बियन आणि पुरुषांना गे असा शब्द सर्रास वापरला जातो. पण क्रिस्टीननं हा शब्ददेखील युनिसेक्स असावा म्हणून स्वतःला 'गे' म्हणवून घेणंच पसंत केलं. मानवेंद्र सिंह गोहिल हे गुजरातमधल्या राजपिपलाचे महाराज आहेत. राजे मानवेंद्र यांनी काही वर्षांपूर्वी आपण गे असल्याचं जाहीरपणे कबूल केलं. भारतीय राजघराण्यातल्या व्यक्तीने आपण समलिंगी असल्याचे जाहीरपणे सांगण्याची ती पहिलीच वेळ होती. त्यांचा जन्म राजस्थानच्या अजमेरचा आहे.  VJ अँडी हा छोट्या पडद्यावरच्या ‘चॅनल V’मध्ये व्हिडिओ जॉकीचं काम करत होता. त्याचं खरं नाव आनंद विजय कुमार असून तो पंजाबी कुटुंबात वाढला. अँडी बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये झळकला होता. समलिंगी असल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या मोजक्या सेलेब्रिटींपैकी अँडी हा एक. सुशांत दिवगीकर हा प्रसिद्ध मॉडेल आणि व्हिडिओ जॉकी आहे. त्याच्या नावावर 'मिस्टर गे' हा किताबही आहे. अनेकांना जगभरात अशीही काही स्पर्धा असते हे माहीतही नव्हतं. मात्र सुशांतमुळे हेही भारतीयांना कळलं असंच म्हणावं लागेल. 

Trending Now