PHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी!

जर एखाद्या व्यक्तीने आपली वस्तू ही फक्त 52 हजारात विकली आणि त्याच वस्तूची किंमत काही दिवसांमध्ये लाख नाही, तर काही कोट्यवधी झाली तर नक्की त्या व्यक्तीला कमनशिबी म्हणावे लागेल. असाच प्रकार अॅपलचे सह संस्थापक रोनाल्ड यांच्यासोबत झालाय. आज अॅपल जगातील टाॅप 10 श्रीमंत कंपनीपैकी एक आहे. एक चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यात होत्याचं नव्हतं होऊन जातं. आज अॅपल जगात सर्वात ताकदवान टेक्नाॅलाॅजी कंपनी आहे. सुरुवातीच्या काळात या कंपनीने अनेक चढउतार पाहिले. अॅपल कंपनी ही दोन नाहीतर तीन लोकांनी मिळून स्थापन केली होती. तिसरे संस्थापक होते रोनाल्ड वेन... अॅपलची सुरुवात 1 एप्रिल 1976 साली झाली. कंपनी सुरू करणाऱ्यांमध्ये स्टीव जॉब्स, स्टीव वॉजनिएक आणि रोनाल्ड वेन सहभागी होते. रोनाल्ड वेन हे त्यावेळी कंपनीत सर्वात अनुभवी व्यक्ती होते. रोनाल्ड यांनीच अॅपलचा लोगो तयार केला. एवढंच नाहीतर अॅपल कंपनीच्या भागिदारीत रोनाल्ड यांचे नाव होते. पण असं काही घडलं की रोनाल्ड यांनी त्यावेळी 800 डाॅलर घेऊन आपले शेअर विकून टाकले आणि कंपनी सोडून दिली.

एका मुलाखतीत रोनाल्ड यांनी सांगितलं की, त्यावेळी माझी 22 हजार डाॅलर प्रत्येक वर्षी कमाई होतो. असं शानदार करिअर सोडून या वयात कोणतीही रिस्क मला घ्यायची नव्हती. कंपनी सोडल्यानंतर स्टीव्ह आणि वॉजनिएक यांनी मला बोलावले होते. पण मी नकार दिला. मला माहित होतं माझी चूक होती पण मी निर्णयावर ठाम होतो. हळूहळू अॅपल कंपनी मोठी होत गेली. आज जगातली सर्वात मोठी टेक्नोलाॅजी कंपनी म्हणून अॅपलचा बोलबाला आहे. पण रोनाल्ड हे याचा भाग नाही. रोनाल्ड यांच्याशिवाय अॅपल कंपनीचे काही महत्त्व नव्हते हे फार कमी लोकांना माहिती आहे. पण आज अॅपल कंपनी ज्या उंचीवर पोहोचली आहे तिच्यापुढे रोनाल्ड कमनशिबीच म्हणावे लागतील.

Trending Now