सुरू होतोय केबीसीचा नवा सीझन, जाणून घ्या यावेळी काय आहे खास?

देवियो और सज्जनो... आठवलं का ? बरोबर. हा आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. कौन बनेगा करोडपतीचा 10वा सिझन सुरू होणार आहे. वर्षानुवर्षे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे केबीसी शो नव्या उंचीवर पोहचला आहे. बिग बींचा अनोखा अंदाज, शोमध्ये येणारे स्पर्धक, त्यांच्या बिग बींचा संवाद, शोमधून समोर येणाऱ्या विविध भावनिक गोष्टी यामुळे केबीसीने टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलं. केबीसीपुढे इतर रिअॅलिटी शोची जादू फिकी पडली. येत्या 3 सप्टेंबरपासून कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय शोचा 10वा सीझन सुरू होतोय. 2 सप्टेंबरला सोनीवर केबीसीचा कर्टन रेझर प्रसारित होईल.

आतापर्यंत 3 कोटी 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी केबीसीसाठी नोंदणी केलीय. याही वेळी 50.50, आॅडियन्स पोल आणि जोडीदार या लाईफ लाईन तशाच ठेवल्यात. आस्क द एक्सपर्ट ही लाईफ लाईन पुन्हा समाविष्ट करण्यात येईल, त्यात एक तज्ज्ञ व्हिडिओ काॅलद्वारे स्पर्धकांच्या प्रश्नाला उत्तर देईल. दर शुक्रवारी 'केबीसी कर्मवीर' असेल. त्यात समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्यांना सामील करून घेण्यात येईल. याच एपिसोडमध्ये डाॅ. प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटेही सामील झाल्यात. केबीसी शो हा 2000साली सुरू झाला होता. हे केबीसीचं 18वं वर्ष आहे.

Trending Now