कपिल 'या' विनोदवीराबरोबर करणार नवा शो!

कॉमेडी किंग म्हणून सगळीकडे प्रसिद्ध असला कपिल शर्मा बराच काळ छोट्या पडद्यापासून लांब आहे. फॅन्स त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. कपिल लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहे. त्याची ही गुड न्युज ऐकून त्याच्या फॅन्सना नक्कीच आनंद झाला असणार. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की, कपिल पुन्हा सोनी टीव्हीवरच परत येण्याच्या तयारीत आहे. आता तुम्ही म्हणाल यात महत्त्वाचं असं काय? तर कपिलचा याआधीची कॉमेडी शो हा सोनी टीव्हीवर यायचा.

सोनी टीव्हीने पुन्हा त्याच्यावर विश्वास दाखवलाय. त्यामुळे आता या नव्या शोमध्ये कपिल काय कमाल दाखवतोय ते पाहणं याबद्दल नक्कीच उत्सुकता आहे. त्याचबरोबर असा अंदाज वर्तवला जातोय की या नव्या शोमध्ये कपिल त्याचा प्रतिस्पर्धक कृष्णा अभिषेकसोबत दिसणार आहे. पण या बाबतीत अजून कृष्णाने कुठलंच ऑफिशियल स्टेटमेंट नाही केलेलं. या आधी असं बोलण्यात आलं होतं की, कपिल आणि कृष्णासोबत भारतीही काम करणार आहे. पण भारतीने यावर नकार दिलाय. सध्या ती बिग बाॅसमध्ये बिझी आहे. त्यामुळे इतर कामांसाठी तिच्याकडे वेळ नाहीय.

Trending Now